भुक का दर्द" साहब ",हर एक दर्द से बढकर है,
 अगर ये दर्द ना हो तो,शायद कोई तकरार ना होती 


                      सेवा ही धर्म है,
                     काम ही कर्म है!
               शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र 
          नेहमी प्रमाणे आम्ही बेवारस, निराधार, वृद्ध लोकांना भोजन देण्यासाठी निघालो हातो,वाटेतच एक माणूस हाताने गाड्यावर बसून सरकत सरकत पुढे निघालेले अंगावर पुर्ण मळालेले कपडे,लांब केस ,जवळ जायला पण भिती वाटत होती परंतू मन घट्ट करुन विचारलेच बाबा तुम्हाला भुक लागली आहे काय काहिच बोलले नाहीत ,आम्हाला वाटल ऐकु येत नसेल म्हणून आम्ही थोडस मोठ्याने बोलले भुक लागलीय काय?? बाबा तरीपण समजल नाही शेवटी आम्हीच डब्बा काढला आणि त्यांना त्यात खायला दिसले आणि बाबांच्या चेह-यावर हास्य फुलले ते खुप आनंदी दिसत होते त्यांनी आमच्या कडून फक्त चपाती आणि भाजी घेतली,
       विषेश म्हणजे त्या बाबांनी आपल्या हाताला देखील माझा हात लागू दिला नाही,त्यांना काय वाटल देव जाणे परंतू मला वाटत आपण ज्यांना वेडे लांब केस असलेले मळके कपडे घातलेले समजतो ते देखील खुप हुशार आसतात फक्त त्यांना आपुलकीची, प्रेमाची,मायेचीच भाषा समजते .
         मला वाटत आपण सर्वांनी थोडस अशा  माणसाबद्दल विचार करायची गरज आहे ,आपण आॅफिस ला कामा निमित्य बाहेर जाताना ,आपण टिफिन मध्ये दोन चपाती ,भाजी,घेऊन गेलात तर त्यांना खायला मिळेल ते तुम्हाला पैसै मागणार नाहित,निश्चित पणे ते तुम्हाला आर्शिवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत.

       हमारी ईस लढाई मै हमारा साथ दे रहे महाराष्ट्र भर के  सभी सदस्य का आभार 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog