निराधार बेघर आज्जी आजोबांच्या चेह-यावर फुलले हास्य .
शिवम् फाऊंडेशन द्वारा आयोजीत सुप्रसिध्द जादूगार (JJ) जगदिश जाधव (JJ's live magic show )हा कार्यक्रम मातोश्री वृद्धाश्रम लातूर येथे आयोजित करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिपक पांढरे यांनी केले.येथील निरागस उदास चेह-यावर हास्य फुलवण्यासाठी त्यांच्या समोर विविध जादूचे प्रयोग दाखवून या आज्जी आजोबांचे मनोरंजन या कार्येक्रमातून करण्यात आले .सदर कार्यक्रम विनामुल्य दाखवण्यात आला .या कार्यक्रमासाठी आश्रमाचे व्यवस्थापक सावंत साहेब,नरसिंह कासले त्यांचे सहकारी व लातूर जिल्हा खाजगी वस्तिगृह संघटनेचे अध्यक्ष संतोष धायगुडे सर तसेच शिवम् फाऊंडेशन चे अध्यक्ष दिपक पांढरे ,सौ.शितल पांढरे ,आलका चोथवे ,नितीन पवार, माधव गायकवाड व आश्रमातील आज्जी आजोबा उपस्तित होती.या कार्यक्रमाचा शेवट मातोश्री चे व्यवस्थापक श्री.सावंत साहेब यांनी केला



Best work done by you
ReplyDelete