वंशाला दिवा किंवा पणती पाहिजेच
मला मुतखड्याचा त्रास होत असल्यामुळे मी लातूरातील एका खाजगी दवाखाण्यात अॅडमिट होतो.ज्यांना मुतखडा आहे अशे मित्र म्हणायचे मुतखड्याचा खुप त्रास होतो म्हणून ही ओळ 100%खरी आहे
        "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" म्हणतात हे काही खोटे नाही दवाखाण्यातील पेशंट च्या वेदना फक्त पेशंट लाच समजतात

       
           मी ज्या रुम मध्ये अॅडमिट होतो त्याच रुम मध्ये दुस-या दिवशी सकाळी एक 60 वर्षाची आज्जी अॅडमिट झाली.त्यांना खुप त्रास होत होता सरळ झोपता देखील येत नव्हते..त्यांना अवघड जागेवर बेंड झाल होत त्यांनी ब-याच डाॅक्टरांना दाखवल ही होत पण ते तातपुरतच बर वाटायच नंतर त्रास पुर्वी आहे तसाच चालू राहायचा.शेवटी त्या शहरातील दवाखान्यात मोठ्या अपेक्षेने आल्या. डाॅक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली ,वेगवेगळ्या टेस्ट केल्या परंतू रिपोर्ट यायला बराच अवधी असल्यामुळे त्यांना खुपच त्रास होत होता,तरीही काही विलाज झाला नाही,त्या आज्जी मला वारंवार म्हणायला लागल्या

                ये बाळा डाकटर साबाला बोलव की ,बोलव की बाळा मरा लई त्रास हुतूय रे,ये सिस्टरिण बाई मला इंजेकशन द्या वो ,मला लय त्रास होतोय.मी मरतेव रे बाबा.मी तर काय करणार डाकटरांना बोललो पण ते म्हणाले आम्ही रिपोर्ट आल्याशिवाय काहीच करु शकत नाही..,
            या आगोदर पण डाॅकटर होतेच की ते कशे लगेच दवाखाण्यात आल्यावर विलाज करत होते ..मी अस डाॅक्टरांना बोललो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे लावून वेळ पुढे नेली..
          आज्जीनी जवळपास 4 तास त्रास सहन केल्या त्या माऊलीची  सहन करण्याची तकाद बघून मला पण कमाल वाटली ..
          त्या आज्जींना निघाली शुगर त्यात हे दुःख आसल..डाॅकटरांनी ताबडतोब विलाज चालू केला डेरेसिंग केली ,अवघड जागेवरच बेडामध्ये जवळपास 1000 लहान मोठी आळी निघाली ....
            हे पाहून तर काहीजण ते रुम सोडून बाहेर गेले ,काही जण स्तभ झाले एवढा त्रास आज्जीनी कसा सहन केला असेल म्हणू लागेल,माझ डोक तर सुंन्न झाल मी आत्तापर्यंत जणवाराला आळ्या पडलेल्या ऐकल्या होत्या..,पण माणसाला तेही एवढ्या  पहील्यांदाच पाहत होतो डाॅक्टरांचे मानावे तेवढे आभार कमीच लोक जवळ थांबायला तयार नाहीत आणि त्यांनी तर एवढे मोठ काम केल संपुर्ण स्टाफ खरच खुप मदतीचा व्यवहार .
             आता आज्जीच्या वेदना कमी झाल्या होत्या त्यांना शांत झोप लागली होती हा प्रसंग पाहून मन तर म्हणत होत दिपक अश्या लोकांसाठी काहीतरी केल पाहिजे ,समाजात किती आशे लोक आहेत जे अश्या वेदनेने त्रस्त आहेत ,त्यांना कोणी बघत नाही.
             आज्जी झोपेतून उठल्यावर मी आज्जीला माझा डब्बा खायला दिला.आज्जीला बोलल्यावर समजल त्या आज्जीला कोणीच नाहीत ,त्यांचे मालक वारले बहिणीच्या मुली त्यांना बघतात पण आज्जीचा तोंडून सारख वाक्य निघत होत.
           बाबा माझ काय देव मरण दिना ,संभालायला कोणी नाही ,शेवटी परक ते परकच ओ ..त्यांच आॅपरेशन च्या वेळी कोणीच जवळ नव्हत.म्हणूनच बाबा देवान माझी कोस उजवली नाही मला वंशाला दिवा बी नाही आणि पणती बी नाही ..हे शब्द आज्जीला  खुप त्रास करत होते.

            पण आज्जीला काय माहित मी दोन वर्षापासून बघतोय तीन तीन मुल असणारी ,मोठ्य मोठ्या पगारी असणारी मुल आई बापाला बघत नाहीत,खायला अन्न मिळत नाहि म्हणून ते मरण पावतात,हे मी डोळ्याने पाहतोय अनुभवतोय .
              मला सुट्टी होणार होती हे आज्जीला समजताच आज्जी रडू लागली आज्जी म्हणाली पोरग चांगल माझी काळजी घेत होत,मला जेवायला देत होत,मला लेकरु माझ आसल्यासारख वाटायच आज्जीच प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं,मी म्हणालो आज्जी येतो भेटायला उद्या आज्जीन जवळ घेऊन मया केली खुप समाधान वाटल.
                  समाजाच चित्र वेगळ आहे समाज सेवा ऐकायला, बघायला खुप छान वाटतय ओ पण करायला नको.तुम्ही करताय ना तर करा तुम्हाला छान झमतय हो आम्हाला वेळच मिळत नाही अशी लोकांची भावना आहे.
           
      
                   अश्या पोष्ट शेअर करणार नाहीत कारण लाईक कमेंट खुप कमी मिळतात ओ मग आपल स्टेटस च काय ? मित्रांनो आज दुस-या व्यक्ती ला वेळ आली आहे काय सांगता येते उद्या आटल्यावर येणार नाही ???
विचार करा समाजात खुप सुंदर लोक आहेत ,त्याचा पुढे दुःख कमी आहे वो फक्त गरज आहे ते आपल्या एका मदतीची .
                सेवा ही धर्म है...,
                 काम ही कर्म है....!
           शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र

Comments

Post a Comment

Popular posts from this blog