"जवानाने सुट्टीवर असताना देखील बजावले आपले कर्तव्य "




शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र शाखा लातूर व विश्व इंग्लिश क्लास यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये एकुण 33 लोकांनी रक्तदान केले.खास म्हणजे B.S.F. महेश झुंजे जवान जे जम्मू येथे आपले कर्तव्य बजावतात ते सुट्टी ला असताना देखील आपले रक्तदान करुन शहीद जवानांना खरी रक्तदान श्रध्दांजली वाहिली , जवान सुट्टी असुन देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावले म्हणूनच जय जवान जय किसान हा नारा सार्थ ठरतो .या वेळी रक्तदान केलेल्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,या वेळी शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक पांढरे सचिव सौ शितल पांढरे विश्व इंग्लिश क्लास चे संचालक प्रा.चंद्रकांत काठेवाड सर ,सौ.मिरा काठेवाड,जिल्हाध्यक्ष शिवम् फांऊडेशन विकास गायकवाड,संर्पक प्रमुख माधव गायकवाड,नितिन ससाणे,प्रा.जाधव सर,प्रा.रनवरे सर,प्रा.सौ.रनवरे मॅडम,प्रा.निलेश सर,प्रा.लामतूरे सर,सतिष साळुंके,शिंदे सर,सुर्यवंशी सर  व मित्र परिवार उपस्थित होता.


Comments

Popular posts from this blog